भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों

purvarjit hoten punya | tenen he charan atudalon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पूर्वार्जित होतें पुण्य । तेणें हे चरण आतुडलों ॥१॥ आतां सुखा नाहीं उणें । इहलोकीं भोगणें परत्रींचें ॥२॥ ऐशिया सुखा पात्र केलें । तुम्हीं अवलोकिलें कृपादृष्टीं ॥३॥ निळा म्हणे पूर्ण काम । पावलों संभ्रम सुखाचा ॥४॥