भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं

purvajanmin sukruten thor kelin

पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तें मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥ परमानंदु आजि मानसीं । भेटी जाली या संतासी ॥२॥ मायबाप बंधु सखे सोयरें । यांते भेटावया मन न धरे ॥३॥ एक एका तीर्थाहूनि आगळे । तयामाजि परब्रह्म सांवळे ॥४॥ निर्धनासि धनलाभु जाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥ वत्स विघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥६॥ हें पियुष्या परतें गोड वाटत । पंढरिरायाचे भक्त भेटत ॥७॥ बापरखुमादेविवर विठ्ठलें । संत भेटतां भवदु:ख फ़ीटलें ॥८॥