भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्व संबंधें मज दिधलें बापानें । शेखी काय जाणें कैसे झालें

purva sambandhen maj didhalen bapanen | shekhi kay janen kaise jhalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्व संबंधें मज दिधलें बापानें । शेखी काय जाणें कैसे झालें ॥१॥ प्रसुतालागीं मज आणिलें कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ॥२॥ मुकुंदें मजशीं थोर केला गोवा । लोटियलें भवानदी माजी ॥३॥ ऐकिला वृत्तांत सर्व झालें गुप्त । माझेंचि संचित खोटें कैसें ॥४॥ द्वादशबहात्तरीं कृष्ण त्रयोदशी । आषाढ हें मासी देवद्वारीं ॥५॥ सर्वांनीं हा देह अर्पिला विठ्ठलीं । मज कां ठेविलें पापिणीसी वेगळी ॥६॥ लाडाई म्हणे देह अर्पीन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥७॥