भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरुषेविण नारी संचरली शरीरी

purushevin nari sancharali shariri

पुरुषेविण नारी संचरली शरीरी । आपण्यावरी आळु आला ॥१॥ काय कोण्यासांगे सिणली अनुरागें । पडियेले पतिसंगें अवस्थाभूत ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठ्लु जैसा तैसा । व्यापूनि आकाशा उरला असे ॥३॥