भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण

purna paripurna pandhari he penth | apan vaikunth samacharan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण ॥१॥ ऐसें कांहीं करा नाम हेंचि धरा । विठ्ठल अपारा जप करा ॥२॥ करितां साधन नागवी अहंकार । विठ्ठल उच्चार पुण्य ओघें ॥३॥ नामा म्हणे घेईं विठ्ठल कुलदेवो । सर्व हाचि भावो केशव ऐसा ॥४॥