भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरे पुरे वो आतां जिणे निमालें

pure pure vo atan jine nimalen

पुरे पुरे वो आतां जिणे निमालें । मज निरंजनी आफ़ाविले गोंवळें वो माय ॥१॥ आणिकाची चाड न लावावो मातें । एकल्या अनंतें मज बरवें केलें वो माय ॥२॥ तें परदीपीं उसळलें अंधारें फ़ेडिलें । कोडे कवतिकें जोडलें स्वरुप वो माय ॥३॥ आतां मी वेगळावलें पांचाहुनी जाहालें । परब्रह्म जोडलें किरु वो माय ॥४॥ ऐसा जगजीवनु जोगावला जगमूर्ति देखिला । तो जगदेश्वरु फ़ळला निरंजनी वो माय ॥५॥ भुक्तीभरीं निडारला निजानंदु घनावला । रखुमादेविवरु स्थिरावला ह्रदयीं वो माय ॥६॥