भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरातन मी शरणांगत । आहे स्थापित सद्गुरुचा

puratan mi sharanangat | ahe sthapit sadgurucha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुरातन मी शरणांगत । आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥ म्हणोनि संत पाळिती मातें । देउनी भातें प्रेमरस ॥२॥ जेउनी उरला प्रसाद देती । निकट बैसविती जवळिकें ॥३॥ निळा म्हणे क्षणक्षणां । देती स्मरणा श्रीहरिच्या ॥४॥