भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुराणीं पवाडे जयाचे अपार । ऐकतांचि फार सुख वाटे

puranin pavade jayache apar | aikatanchi phar sukh vate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुराणीं पवाडे जयाचे अपार । ऐकतांचि फार सुख वाटे ॥१॥ भोळा महादेव पाहे भोंळा भाव । एकसरें जीव उद्ध-राया ॥२॥ रावण मागों गेला पार्वतीकारणें । देते वेळे नेणे कैसें द्यावें ॥३॥ जातीची चांडाळी गोकर्णासी गेली । दरुशनें ते नेली कैलासासी ॥४॥ नामा म्हणे कैसें दैव या भिल्लाचें । आलें पूज-नाचें फल हातां ॥५॥