भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यवंता दावी बाळलीला देव । पालथा केशव पड-तसे

punyavanta davi balalila dev | palatha keshav pad-tase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुण्यवंता दावी बाळलीला देव । पालथा केशव पड-तसे ॥१॥ नंदें उत्साहासीं केलें तेव्हां फार । दिधलें अपार द्रव्य द्विजां ॥२॥ यशोदा घेतसे देवासें चुंबन । तुजला न्हाणीन तान्ह्या माझ्या ॥३॥ चोंगईचा मुका घेताती गौळणी । हांसे चक्रपाणी आनं-दानें ॥४॥ नामयाचा स्वामी मंद मंद हांसे । यशोदा करितसे निंबलोण ॥५॥