भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला दरिद्री तो भाग्यवंत केला। धुंद झाला तुझा दरबार।।ध्रु

punyavant patal lokin nela daridri to bhagyavant kela| dhund jhala tujha darabar||dhru

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला दरिद्री तो भाग्यवंत केला। धुंद झाला तुझा दरबार।।ध्रु।। चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ।। १ ।। वैरिवासी दिधली मोक्षसिद्धि। कपटिया दिली महानिधी सेवकाच्या गा न मिळे चिंधी चालकासी त्रैलोक्य भायें बंदी ||२॥ पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली कळी स्वकुळा लावियेली। यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली।।३।। सत्त्वत्वानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ||४||