भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें तो भिकारी जाता झाला वेगें । आपुलिया रंगें रंगूनियां

pudhen to bhikari jata jhala vegen | apuliya rangen ranguniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुढें तो भिकारी जाता झाला वेगें । आपुलिया रंगें रंगूनियां ॥१॥ येकाकार करी चित्त आणि वृत्ति । पाहे लक्ष्मीपति दुरोनियां ॥२॥ तटस्थ जाहाला चालला त्वरित । मुखीं नाम गात गोविंदाचें ॥३॥ नामा म्हणें नीर पाझरे लोचनीं । समाधी लागुनी मुनी ठेला ॥४॥