भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढे जातां कष्ट प्रेम निर्मी पोह्याचा आश्रम

pudhe jatan kashta prem nirmi pohyacha ashram

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पुढे जातां कष्ट प्रेम निर्मी पोह्याचा आश्रम ।।१।। धर्मपोहेची कुसरी शोभा रमणीय साजिरी ||२|| वृक्ष लागले अंबरी । डोलताती नानापरी ।।३।। फणस कर्दळी गंभेरी आंबे नारळ खजुरी ॥४॥ चिंचा पपया जंभळी गुंज खिरण्या रायकेळी ||५|| सीताफळें कवठें निंब बोरें परीच्या दाळिंब ॥६॥ जाई मोगरा सेवंनी चांपा बकुल मालती ।।७।। पारिजातक हे चमेली झेंडू गुलबास मखमली||८|| तुळसी मंजु शोभती नानापरी पुष्पजाती।।९।। प्राप्त वसंताचा काळ मधु कुंती कोकिल।।१०।। रंभा ऐसा देवांगना सर्व शृंगारी भूषणा ।।११।। बेलवाळा तोयें सारी उभ्या तिष्ठताती द्वारीं।।१२।। सुगंध वनीं शीतल जळ । ऐसें शोभे रम्य स्थळ ||१३|| ऐसी देखोनी वाटिका। चोज नाहीं नृपनायका ।।१४।। म्हणती हे धर्मपथे जनी म्हणे पुढे जाये ।।१५।।