भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथ्वी माजी पाहतां नाहीं म्यां देखिला । हस्तिसी उडवील ऐसा कोण्हीं

pruthvi maji pahatan nahin myan dekhila | hastisi udavil aisa konhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पृथ्वी माजी पाहतां नाहीं म्यां देखिला । हस्तिसी उडवील ऐसा कोण्हीं ॥१॥ शोधितां शोधितां आलों पंढरीसी । तेथें ज्ञानोबासी देखियेलें ॥२॥ मोक्षमार्गीं देवें हा गजरात बांधला । तो ज्ञानी उडाला गोल्हाटासी ॥३॥ पृथ्वीमाजी पाहातां ज्ञानीच कोल्हाटी । ढिसाळ हे दृष्टि तृणप्राय ॥४॥ उडोनियां तेणें दर्शन घेतलें । हस्तीसी जिंकिलें ज्ञानदेवें ॥५॥ याचिया इशाळे करील जो मूर्ख । पाहूनियां दु:ख कष्टी होय ॥६॥ धन्य ज्ञानदेव योग साधू-नियां । भक्ति आचरोनियां दावी लोकां ॥७॥ नामा म्हणे सर्व खटपट सांडोनि । पांडुरंग मनीं भावें ध्यावा ॥८॥