भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथ्वी आडणी आकाश हें ताट

pruthvi adani akash hen tat

पृथ्वी आडणी आकाश हें ताट । अमृत घनवट आप तेज ॥ नित्य हें जेवितां तेज प्रकाशत । सर्वलि गोमटी ब्रह्मद्वारें ॥१॥ जेवणार भला जेउनिया धाला । योगि जो निवाला परमहंस ॥२॥ चांदिणा वोगरु दिसे परिकरु । नवनित घातलें व्योमी बरवें ॥ निळिये परवडि शाक जालें निकें । अंबट घाला तिखें प्रेम तेथें ॥३॥ गंगा यमुना तिसरिये सागरीं । म्हणौनि प्रकारी क्षीर जाली ॥ सोज्वळ ब्रह्मतेजें साकर सोजोरी । जेवितो हे गोडी तोचि जाणे ॥४॥ इडा क्षीर घारी पिंगळा गुळवरी । त्या माजि तिसरी तेल वरी ॥ सुषुम्नेचे रुची तुर्या अतुडली । अहिर्निशि जाली जेवावया ॥५॥ सितळ भिनला चंद्र अंबवडा । सूर्य जो कुरवडा खुसखुसित ॥ तया दोहीं संगें भाव हेचि मांडे । मग जेवा उदंडे एक चित्तें ॥६॥ पवित्र पापडु मस्तकिं गुरुहस्त । म्हणउनि अंकित तयातळी ॥ सोरसाचि गोडी जयासी लाधलीसे । उपदेशितां जालीं अमृतफ़ळें ॥७॥ कपट वासनेचि करुनिया सांडई । शेवा कुरवडई गोमटी किजे ॥ गुरुचरणीं लाडू करुनियां गोडु । मग जेवी परवडी योगिराजु ॥८॥ गुरुपरमार्थे ग्रासुनिया भूतें । क्षेम अवकाशातें आच्छादुनि ॥ जेवणें जेवितां ध्वनि उठे अंबरीं । तें सुख अंतरीं प्रेम वाढे ॥९॥ षड्रसाचि उपमा देऊं म्हणो जर । ब्रह्म रसापरते गोड नाहीं ॥ येणें दहिभातें जेवणें हे जाले । तिखटही आलें प्रेम तेथें ॥१०॥ अमृत जेविला अमृतें आंचवला । सेजे विसावला निरालंबीं ॥ मन हें तांबूल रंगलें सुरंग । नव जाये अभंग कव्हणीकडे ॥११॥ कापुर कस्तुरी शुध्द परिमळु । गोडियेसि गुळु मिळोनि गेला । सुमनाचि मूर्ति सुमनीं पूजिली । सुमनीं अर्चिलि कनकपुष्पीं ॥१२॥ ऐसें नानापरिचें जेवण जालें । बापनिवृत्तियोगियानें वाढिलें ॥ ज्ञानदेव म्हणे धणिवरि जेविलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें सुखिया केलें ॥१३॥