भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रवेश राउळाभीतरीं । केला संतमुनीश्रवरीं

pravesh raulabhitarin | kela santamunishravarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रवेश राउळाभीतरीं । केला संतमुनीश्रवरीं ॥१॥ तंव तो घननीळ सांवळा । उभा विटेवरीं देखिला ॥२॥ कांसे मिरवे पीतांबर । विराजित कटीं कर ॥३॥ मुख सुहास्य चांगलें । केशर निढळी रेखिलें ॥४॥ अंग प्रत्यंगी भूषणें । दिव्यमाळा करकंकणे ॥५॥ निळा म्हणे संतभेटी । उता वेळ घली मिठी ॥६॥