भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम

pratipal sampratidnyecha nem

प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम । सर्वज्ञता तम गिळीतसे ॥१॥ तें रूप सकुमार गोपवेषधर । सर्वज्ञ साचार नंदाघरीं ॥२॥ त्रिपुर उदार सर्वज्ञता सूत्र । नाम रूप पात्र भक्तिलागीं ॥३॥ निवृत्ति संपदा सर्वज्ञ गोविंदा । सूत्रमणी सदा तेथें निमो ॥४॥