भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रथम अवतारीं देव मच्च झाले सागरीं । वधोनि शंखा-सुर वैरी आणिले वेद

pratham avatarin dev machcha jhale sagarin | vadhoni shankha-sur vairi anile ved

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रथम अवतारीं देव मच्च झाले सागरीं । वधोनि शंखा-सुर वैरी आणिले वेद ॥१॥ कूर्म अवतारी सांवरीली सृष्टी । वरा-हद्विज नेहटी धरणीधरु ॥२॥ प्रल्हाद कैवारा स्तभांभितरीं । बळी बंधन हरी प्रगत झाला ॥३॥ रेणुका नंदन द्विजकुळ पाळण । त्रिं-बक भजन रघुनाथ ॥४॥ गोकुळीं अवतारू सोळासहस्र वरू । आ-पण योगेश्वरू बौध्यरूपीं ॥५॥ कल्की अवतारू वदतसे वरू । नामया दातारू केशिराज ॥६॥