भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात: काळीं मुलें येताती सकळ । उठवीं गोपाळ ह्मण-ताती

prat: kalin mulen yetati sakal | uthavin gopal hman-tati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात: काळीं मुलें येताती सकळ । उठवीं गोपाळ ह्मण-ताती ॥१॥ आळस देवोनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडी-तसे ॥२॥ देऊनियां स्तना काकुळती येत । सांभाळा भगवंत वना-मध्यें ॥३॥ जवळींच खेळा जाऊं नका दूरी । सांभाळा मुरारी प्राण माझा ॥४॥ होताती उत्पात याजवरी मोठे । मोडतील कांटे सांभा-ळावें ॥५॥ आसनीं शयनीं भोजनीं जतन करा । नामया दातार केशिराजा ॥६॥