भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रसन्न वदन सदा विळ आहे । कां करिसी उपाव कर्म जाड

prasanna vadan sada vil ahe | kan karisi upav karma jad

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रसन्न वदन सदा विळ आहे । कां करिसी उपाव कर्म जाड ॥१॥ मंत्रांचा पैं मंत्र बीज नाम हरीचें । तेंचि हें शिवाचें रामनाम ॥२॥ तुटेल भवकंद जासील निजपंथें । झणीं तूं दुश्चितें करिसी चित्त ॥३॥ नामा म्हणे भजन सर्व हरीचें करी । होईल बोहरी प्रपंचाची ॥४॥