भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रसा भागवतें केला नमस्कार । सारे लहान थोर जमा जाले

prasa bhagavaten kela namaskar | sare lahan thor jama jale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रसा भागवतें केला नमस्कार । सारे लहान थोर जमा जाले ॥१॥ सकलांचिया पायीं नमियलें नमना । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥ प्रथम पायरी बाहेरील जेथ । उभा पंढरीनाथ भेटावया ॥३॥ देव म्हणे बापा अमृत नेदी पाट । फार केले कष्ट जगासाठीं ॥४॥ नामा म्हणे यांनीं अनुभवाच्या नौका । पार केलें लोकां जडमूढां ॥५॥