भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाचें जगडवाळ दुस्तर जरी मानिसी

prapanchachen jagadaval dustar jari manisi

प्रपंचाचें जगडवाळ दुस्तर जरी मानिसी । त्याग करुनि केउता जासी । जें जें त्यागिलें तें तें तुज माजी । त्यागिलें तें काय सांग आम्हांसी । तुझें तुजचि माजि प्रपंचेंसि तूं सर्वामाजी वर्तसी । ऐसें जाणोनिया कां विटंबिसी बापा । टाकूनि केउता जासी रया ॥१॥ मनेंसि विचारी निर्धारुनी योग करी । तुझें तुजमाजि अरे आतां विचारी बापा । अरिमित्रसम होऊनि मनें हें शुध्द होय । तेंचि तूं होऊनि राहे जाण बापा ॥२॥ बाह्य त्यागिसि तरी तो त्यागुचि नव्हे पालटिसी तरी ते विटंबना । धरिसी तरीचि तो बंधु मोक्ष मागता हे जडपणा । तरि गेलिया जड तो मोक्षचि नव्हे साचा चुकलासि उगाणा । वृत्तिशून्याकारें अवलोकितां तंव तेणें नव्हें तुज वस्तुज्ञान । ऐसें जाणोनी कां सिणसीरे बापा । हेचि धरुनि राहे निज खुण रया ॥३॥ म्हणौनि आतां इतुकें करी । साच तें हे धरी तुझें मन होय तुज अधिकारी । तैं सर्वही त्याग तुज फ़ळती बापा । जैं एकचि होऊनि निर्धारी नलगे सिणणें दंडणे येणेंचि आश्रमभावें ऐसेंचि मनें निर्धारी । बाप रखुमादेविवरुविठ्ठलु चिंतितां सर्व प्रपंचाची जाली बोहरी । निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळा । निजीं निजाचे निज निर्धारी रया ॥४॥