भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ

prapanch taval vrukshachen phal

प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ । उपटिलें मूळ कल्पनेचें ॥ १ ॥ गेली ते वासना निमाली भावना । चुकलें बंधना यमपाश ॥ २ ॥ उपजत मूळ खुंटलें तें जाळ । मायेचें पडळ हरपलें ॥ ३ ॥ निवृत्तिस्वानंद नित्यता आनंद । जग हा गोविन्द आम्हां पुरे ॥ ४ ॥