भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणीमात्र पर्वतातळीं । राहिले ते निजानंद मेळीं । नित्य हरिकीर्तीची नव्हाळी । श्रवण मनन करिताती

pranimatra parvatatalin | rahile te nijanand melin | nitya harikirtichi navhali | shravan manan karitati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्राणीमात्र पर्वतातळीं । राहिले ते निजानंद मेळीं । नित्य हरिकीर्तीची नव्हाळी । श्रवण मनन करिताती ॥१॥ सप्तअहोरात्रीवरि । पर्जन्यवृष्टी केली भारी । विजुवा कडाडिती गगनोदरीं । तेणे ब्रम्हांड फुटों पाहे ॥२॥ मुसळधाराखळखळाटें । नदियां पूर वाहति नेटें । पवन वातें झडझडाटें । पाषाण जाति उडोनिया ॥३॥ परि तया पर्वतातळीं । पर्जन्य वात नपवेचि बळी । हिंपुटी होऊनियां जवळीं । गेलि इद्रां सांगती ॥४॥ सप्त अहोरात्रे पाडिलों वरी । खाणोनि सांडिली ते नगरी । खडका वांचूनियां दुसरी परी । नुरोचि मृत्तिका ऐसें केलें ॥५॥ ऐकोनियां हरिखले सुरपती । बहूत मानवाला त्याचे शक्ति । परी गोकुळींच्या लोकांप्रती । नाहींची आढळला पर्जन्य वात ॥६॥ निळा म्हणे हरी दादुला । सकळिकां म्हणे बाहेरीं चला । अवघा मेघ ओसरोनि गेला । उन्हें पडिली खडखडाट ॥७॥