भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रणवाची शक्ती शिव प्रणवची

pranavachi shakti shiv pranavachi

प्रणवाची शक्ती शिव प्रणवची । क्षर अक्षर साची प्रणव ते ॥१॥ त्रिकूट श्रीहाट गोल्हाट ब्रह्मरंध्र । प्रणव निरंतर ऐक्य झाला ॥२॥ ज्ञानदेव आपण प्रणव झाला आधीं । ध्याता ब्रह्मपदीं प्रणवची ॥३॥