भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रणवाचें रुप कोणें देहें देखिलें

pranavachen rup konen dehen dekhilen

प्रणवाचें रुप कोणें देहें देखिलें । निवृत्तिनें दाविले याच देहीं ॥१॥ सकार हकार तुर्या उन्मनी भेद । अभेदुनी भेद केले मज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली । अक्षरीची बोली देह सार ॥३॥