भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रणवाचें आकाश असे सर्वावरी

pranavachen akash ase sarvavari

प्रणवाचें आकाश असे सर्वावरी । आकाशीं भरोवरी प्रणवाची ॥१॥ प्रणव जें गुह्य ऋषि योगीयांचे । सर्वावरिष्टा साचें वेद आज्ञा ॥२॥ एक वेदांत सिध्दांती प्रणव तो तत्त्वता । ज्ञानदेव वक्ता सांगतसे ॥३॥