भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रणवच देह देह हा प्रणव

pranavach deh deh ha pranav

प्रणवच देह देह हा प्रणव । कल्पनेचा भाव कल्पूं नये ॥१॥ अंजनाचें सार तेंच देह बा रे । आत्मा परिपूर्ण सारे पाहती ज्ञानी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता । अक्षर तेच माता याच भेदें ॥३॥