भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणासवें सखि आत्मा हा बिंबला

pranasaven sakhi atma ha bimbala

प्राणासवें सखि आत्मा हा बिंबला । सवेगुणी निमाला याच्या वृत्ति ॥ ध्यान गेलें ठायां मन गेलें सुखा । नयनीं नयनसुखा अवलोकीं ॥ तेंचि सखि रुप वोळखे स्वरुप । विश्वीं विश्वरुप एका तेजें ॥२॥ द्वैत पै नाहीं दिसे अद्वैत सुरवाडु । एक दीपें उजेडु सर्वां घटीं । विराल्या कामना अमूर्त परिपाठीं ॥ चैतन्याची दृष्टी उघडली रया ॥३॥ सखी ह्मणे सुख प्राणासि भुललें । आत्मपणें मुकलें काय करुं । बापरखुमादेवीवर विठ्ठलें रुप । दाऊनि स्वरुप एक केलें ॥४॥