भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणाची पै सखी पुसे आत्मयासी

pranachi pai sakhi puse atmayasi

प्राणाची पै सखी पुसे आत्मयासी । ईश्वरीं ध्यानाची वृत्ति गेली ॥ पांगुळल्या वृत्ति हरपली भावना । निमाली कल्पना ब्रह्मीं रया ॥१॥ हें सुख साचार सांगे कां विचार । आत्मयाचें घर गुरुखुणें ॥२॥ चेतवितें कोठें गुंफ़लें सगुण । निर्गुणी पै गुण समरस ॥ तें सुख अपार निळिये वेधलें । कृष्णरुप देखिले सर्वांरुपीं ॥३॥ या ध्यानीं गुंफ़लें मनामाजि वेख । द्वैतभानसुख नाठवे मज ॥ अद्वैत घरकुलें गुणाचें पै रुप । मनामाजि स्वरुप बिंबलें रया ॥४॥ विस्मृति गुणाची स्मृति पै भजन । दृष्टादृष्ट जन ब्रह्मरुप ॥ याचेनि सुलभे नाठवे संसारु । ब्रह्मींचा आकारु दिसत असे ॥५॥ वेगी सांग ठसा कोण हें रुपडें । कृष्णचि चहूंकडे बिंबलासे । बापरखुमादेवीवरु विठ्ठल सखी । कृष्णरुपीं सुखी तनु जाली ॥६॥