भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राकृत संस्कृत एकचि मथीत

prakrut sanskrut ekachi mathit

प्राकृत संस्कृत एकचि मथीत । गुरुगम्य हेत पुराणमहिमा ॥ १ ॥ वेदादिक मत शास्त्र हें बोलत । श्रुतीचा संपत वाद जेथें ॥ २ ॥ पृथ्वी हे ढिसाळ आकाश कव्हळ । जन्म मायाजाळ विरत जेथें ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे गुरु गयनि सौरसें । आपण जगदीश सर्वारूपीं ॥ ४ ॥