भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू

phugadiफ़uge bai phugadiphu

फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू । निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥ मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥ एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥ हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥ सकळ पाहे हरी । तोचि चित्तीं धरी ॥५॥ नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥ वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥ ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥८॥