भजनी मालिका
← भजनांकडे परत

पेहरंब्याचे सोई गे सारविसी भुई । परि येथें तेथें असे अवघाचि हरि पाही

peharambyache soi ge saravisi bhui | pari yethen tethen ase avaghachi hari pahi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पेहरंब्याचे सोई गे सारविसी भुई । परि येथें तेथें असे अवघाचि हरि पाही ॥१॥ कापवितां हात जरी सावधान चित्त । तरीच होईल मान न पवतां घातपात ॥२॥ नाचविसी पाय गे घोळसूनि भोय । परि नग्न दाखवितां जगीं हासे होय ॥३॥ निळा म्हणे बरा गे विचार करी धीरा । आठवूनि हदयांत राहे शारंगधरा ॥४॥