भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाय जोडूनि विटेवरी कर ठेउनी कटावरी

pay joduni vitevari kar theuni katavari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पाय जोडूनि विटेवरी कर ठेउनी कटावरी ॥१॥ रूप सांवळें सुंदर कानी कुंडलें मकराकार ॥२॥ गळां माळ वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥३॥ गरुड सन्मुख उभा म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥