भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान

pavalo prasad ichchha keli taisi | jhale ya chittasi samadhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानीं । विटे सम जोडुनि पदांबुजें ॥२॥ सांभाळीसी येउ नेदिची उणीव । अधिकार गौरव राखे तैसे ॥३॥ निळा म्हणे सर्व जाणें अंतर्बाहे । जया तैसा राहे कवळुनिया ॥४॥