भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतंग सुखावला भारी उडी घाली दीपावरी

patang sukhavala bhari udi ghali dipavari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पतंग सुखावला भारी उडी घाली दीपावरी ॥१॥ परि तो देहांती मुकला। दोहीं पदार्थी नाडिला॥२॥ विषयांचे संगतीं बहू गेले अधोगती ।।३।। ऐसे विषयानें मुलविले जनी म्हणे वांयां गेले ॥४॥