भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी

patang sukhavala bhari | udi ghali dipavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी ॥१॥ परि तो देहांतीं मुकला । दोहीं पदार्थीं नाडिला ॥२॥ विषयांचे संगती । बहु गेले अधोगती ॥३॥ ऐसे विषयानें भुलविले । जनी म्हणे वांयां गेले ॥४॥