भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिसुनी ते गोष्टी घाली चरणीं मिठी । दाटलासे कंठीं सद्‌गदित

parisuni te goshti ghali charanin mithi | datalase kanthin sad‌gadit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परिसुनी ते गोष्टी घाली चरणीं मिठी । दाटलासे कंठीं सद्‌गदित ॥१॥ कृपेचें पोसणें मी पंढरीरायाचें । येवढें भाग्य कैचें मज जाणिवेचें ॥२॥ नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील । दास मी दुर्बळ वैष्णवांचा ॥३॥ नेणतें नेणतेम कांहींच मी नेणतें । म्हणोनि देवें तुम्हांतें निरविले ॥४॥ येतां माझा हात दिधला तुमच्या करीं । घातलें आभारीं मायबापें ॥५॥ याचेनि कृपावसें येईल वाचेसरिसें । कळेल कांहीं तैसें निवेदीन ॥६॥ परी भानूसी देखणें करिजे अनुतेजें । तैसें ज्ञान माझें स्वामीप्रती ॥७॥ कल्पतरु याचक कृपणाचे द्वारीं । कां दैन्य भाकी थोरी कामधेनु ॥८॥ तैसी तुमची यांच्या मज दीनाप्रती । नकळे काळगति समर्थाची ॥९॥ मातेचिया स्नेहें बाळक बोबडें । खेळे लाडें कोडें नेणे लाजो ॥१०॥ नामा म्हणे तैसें तुम्हीं माझें कवतुक । करुनी सुखें सुख वाढविताम ॥११॥