भजनी मालिका
← भजनांकडे परत

परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे

parikshiti raya sangatase shuk | vaikunthanayak rangatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥१॥ दुडदुडा पळती मुखीं लावी माती । शेणांत लोळती दोघे-जण ॥२॥ नंदाच्या पुढील ओढीताती ताट । मिटक्या मटमट वाजविती ॥३॥ कटीं कडदोरा वांकी घुंघुरवाळा । पिंपळपान भाळा शोभतसे ॥४॥ देवातें झोंकिती वर्जिल्या रडती । घडोघडीं येती बिदीमाजीं ॥५॥ वत्साचिये पुच्छें बळें ओढिताती । सोडी न सो-डिती दोघेजण ॥६॥ विमानांची दाटी येताती सुरवर । नाम्याचा दातार पाहावया ॥७॥