भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली

pareche shikharavari vasti majhi jhali

परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली । समरसें विराली मज माजी ॥१॥ आत्मदशे योगी लक्ष लाविती देहीं । ब्रह्मरंध्रु पाहीं सतपद तें ॥२॥ अणुरेणु शून्य गगना तेजें दिसे । निरंतर वसे निरंतर ॥३॥ ज्ञानदेव म्हणे वृत्ति सहस्त्रदळीं लावा । मसुरा मात्रा बरवा ध्यायी जाई ॥४॥