भजनी मालिका
← भजनांकडे परत

परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी

pare pade mithi tethe bolanechi nuthi

परे पडे मिठी तेथे बोलणेचि नुठी । आवडी गिळुनियां आतां जिवे नाहीं तुटी ॥१॥ सांगिजे बोलिजे तैसे नव्हेगे माये । सुमर मारिलें येणें श्रीगुरुराये ॥२॥ निवृत्ति दासास निधान दुरी । आवडी गिळुनि आतां जिवे नाहीं उरि ॥३॥