भजनी मालिका
← भजनांकडे परत

परस्परें गुह्य करिती भाषण । म्हणती महाधन गांवा आला

parasparen guhya kariti bhashan | mhanati mahadhan ganva ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परस्परें गुह्य करिती भाषण । म्हणती महाधन गांवा आला ॥१॥ रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार । नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥ प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणें । दीप त्रिभुवनीं एक जाला ॥३॥ निवृत्तिदेव म्हणे कुलालाचें चक्र । अंतर बाहेर एक ऐसें जालें ॥४॥