भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमेष्ठी परब्रह्म। । तोचि माझा आत्माराम

parameshthi parabrahma| | tochi majha atmaram

रचनाकार: संत रामदास · अभंग
परमेष्ठी परब्रह्म। । तोचि माझा आत्माराम। ।। कैसें केलें संध्यावंदन । सर्वां भूतीं हो नमन ।। नाहीं आचमनासी ठावो । तेथे नामचि जालें वावो ।। जेथें हरपले त्रिकाळ । ऐसी संध्येसि साधली वेळ ।। कळिकाळा तीन चूळ पाणी । रामदास दे सांडुनी ।।