भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्म विश्वाकारें अवतरलें भक्तिकाजा । मूर्ति सु-नीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा

parabrahma vishvakaren avataralen bhaktikaja | murti su-nilu sanvali keshiraju svami majha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रह्म विश्वाकारें अवतरलें भक्तिकाजा । मूर्ति सु-नीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा ॥१॥ गोविंदारे तुझें ध्यान लागो मना । पाहिजे प्रेमपद निर्मळ होत ज्ञान ॥२॥ मन हें वोवरी असे सुमनाचे चित्रशाळी । दोन्ही चरण सुकुमारे वरीं अष्टदळ क-मळी ॥३॥ संध्याराग रातले सुनीळ दिशातळवटीं । ध्वज वज्रांकुश चिन्हें साजती गोमटीं ॥४॥ इंदिरा तिथें थोकली तिच्या सुखा नाहीं पारु । ते चरणीं स्थिर झाली ह्मणोनि ह्मणती लक्ष्मीवरु ॥५॥ घवघवीत वांकी चरणीं ब्रिदाचा तोडरु । नखप्रभा फांकली तिनें लोपला दिनकरु ॥६॥ सृष्टि घडीत मोडीत उत्पत्ति स्थिति प्रळय अवघें नवें । तो चतुर्मुख ब्रह्मा चरण पूजितो स्वभावें ॥७॥ देवा धिदेव शंभू कैलासींचा राणा । गंगा मुगुटीं धरिला तिचा जन्म अं-गुळीं चरणा ॥८॥ दैत्यकुळीं जन्मला देव पळती ज्याचेनि धाकें । पावो पाठीसी लागला ह्मणऊनि दारवंटा राखे ॥९॥ शेष वर्णितां श्रमला वेद परतले माघारीं । नामा ह्मणे अरे मना याचे चरण धरीं झडकरी ॥१०॥