भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्म सांवळे गोपवेशें निरालें

parabrahma sanvale gopaveshen niralen

परब्रह्म सांवळे गोपवेशें निरालें । ह्रदलकमळीं स्थिरावलें काय सांगो ॥ कायावाचामनें पाहे जों पाहणें । तव नवलाव होये निर्गुणरया ॥१॥ नामरुपीं गोडी हेचि आवडी आतां । न विसंबे सर्वथा तुजलागी ॥ध्रु०॥ जगडवाळ जाण कारे याचें ॥ तुझीचि बुंथी तुजचि न कळे याचें चोज । केंवीं वर्णिसी सहज गुणे रया ॥२॥ म्हणोनि दृष्टि चोरुनि पडे मिठी । मन चोरुनिया पुढतापुढती तुजचिमाजि ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला ॥ उदारा येणेचिं नाहीं त्रिशुध्दि । येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनिया । सकळगुणीं गुणातीत तुटली आधी रया ॥३॥