भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्म पूर्ण तुझा आहे सखा । मानिसी कां दु:खा जननीये

parabrahma purna tujha ahe sakha | manisi kan du:kha jananiye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रह्म पूर्ण तुझा आहे सखा । मानिसी कां दु:खा जननीये ॥१॥ इंद्राचा अवतार आहे हा अर्जुन । घेईल हा प्राण कौरवांचा ॥२॥ करील गे युद्ध धरोनियां धीर । न देखें मी वीर त्रैलोक्यांत ॥३॥ सांगूनियां ऐसें पुसोनी सर्वांसी । आला मधुरेसी नामा म्हणे ॥४॥