भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें । गळां स्तन झाले शेळियेचे

papishtachen jinen kay te jivalen | galan stan jhale sheliyeche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें । गळां स्तन झाले शेळियेचे ॥१॥ येथेंचि जो खोटा तेथें तो करंटा । व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥ तप्त ताम्र भूमि लोळविती नरा । लेटिती अघोर नरकामाजी ॥३॥ लोहोचंबुकाग टोंचिती येवोनी । मारि-ताती घणीं माथां घाव ॥४॥ वांधोनियां गळां टांगिती उफराटें । ह्मणताती सोटे वंरिच्यावरी ॥५॥ आसीपत्रावरी वोढिसी धरोनी । लेटिती नेउनी कुंभपाकी ॥६॥ जळतिया खाबा भेटविती बळें । खैरा़च्या इंगळें नाहाचिती ॥७॥ प्रळय क्रूर सर्प झोंबचिती कंठासीं । ओढोनि जिव्हेसी खंड करिती ॥८॥ नामा ह्मणे ऐसी पापिष्ठाची गती । जन्म लक्ष शतीं हेंचि फळ ॥९॥