भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापाचें संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं

papachen sanchit dehasi dandan | tuj narayana bol nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पापाचें संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥ सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वा-उगाची ॥२॥ पेरि कडु जीरें इच्छी अमृतफळ । अर्किवृक्षा केळीं येती ॥३॥ मुसळाचें धनु न होय सर्वथा । पाषान पिळितां रस कैंचा ॥४॥ नामदेव म्हणे देवा कां रुसावें । मनाला पुसावें आपुलीया ॥५॥