भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंथ क्रमितां तिघांसी। आडवा आला कपटवेषी

panth kramitan tighansi| adava ala kapataveshi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पंथ क्रमितां तिघांसी। आडवा आला कपटवेषी।।१।। होवोनियां वृद्ध विप्र हात काठी भार्याकुमर ||२|| म्हणे धन्य रे नृपेशा । तुझा कीर्तिघोष ठसा ||३|| भेरी गर्जती त्रिभुवनीं धांवून आलों मी ऐकुनी ||४|| आज्ञा करावी जी स्वामी तुमचे शरणागत आम्ही ॥५॥ करुणा दाखवी रायासी दीन आम्ही तीर्थवासी ॥६॥ पुढें प्रवास कठीण । पायीं नाहीं पायतण ॥७॥ तिघां वोपोनियां जोडे। जनी म्हणे जाती पुढें ||८||