भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काया या दोन्ही पणीं वेगळीक

pani tenchi megh megh tenchi pani | kaya ya donhi panin vegalik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काया या दोन्ही पणीं वेगळीक ॥१॥ माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥ साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥ डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥४॥ वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन ॥५॥ जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन ॥६॥ संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्टी भिन्न ॥७॥