भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगाचें नाम बरवें । आवडी घेतली माझ्या जीवें

pandurangachen nam baraven | avadi ghetali majhya jiven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांडुरंगाचें नाम बरवें । आवडी घेतली माझ्या जीवें ॥१॥ कैसा देहुडा पाउलीं उभा । वेणुनादीं गोपाळ वेणु वाहे ॥२॥ आंगीं चंदन चर्चित माळा गळां । भाळीं शोभताहे कस्तुरीचा टिळा ॥३॥ नामा म्हणे धन्य धन्य जिणें । एकावेळा पंढरी पाहणें ॥४॥